30 Years of Growth in Education.

दि. २७ फेब्रुवारी २०२६ व दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आर. के. लॉ. कॉलेज भांडुप (प) तर्फे एल.एल.बी.प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक क्रिडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.सदर क्रीडा महोत्सवात बैठे व मैदानी असे दोन क्रीडा प्रकार आयोजित केले होते.महोत्सवाच्या सुरुवातीला प्राध्यापक अक्षता पवार मॅडम व प्राध्यापक श्री रुपेश तांबे सर यांनी खेडाळूंना क्रीडा शपथ दिली त्या नंतर महाविद्यालयाच्या पटांगणात झेंडा वंदन करून महोत्सवास सुरुवात झाली.बैठ्या क्रीडा प्रकारात बुद्धिबळ व कॅरम तसेच मैदानी खेळात क्रिकेट, बॅडमिंटन, धावणे असे क्रीडाप्रकार आयोजित केले होते.विदयार्थी निलेश आचरेकर यांनी आपल्या बुद्धीचे चातुर्य दाखवत बुद्धिबळ तसेच कॅरम या स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले..क्रिकेट या सांघिक खेळात सुशांतकुमार गौडा यांच्या संघाने विजय श्री मिळवला. बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात राज भानुशाली यांनी विजयी पताका लावला.तसेच धावणे या क्रीडा प्रकारात ऋतुजा गोळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.अशा प्रकारे आर.के.विधी महाविद्यालयातील हा दोन दिवसीय क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करत संचालक व प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला.

error: Content is protected !!