30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजाराम शेठ विद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचा महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रश्मी रमेश खानविलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर नृत्य, समूहगायन, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तसेच प्रेरणादायी व प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेली दाद टाळ्यांच्या कडकडाटातून व्यक्त झाली. कवायत, परेड ,समूहगीतानी उपस्थितांची मने जिंकली.
शैक्षणिक वर्ष २०२६ मध्ये इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारी विद्यार्थिनी कुमारी तन्वी भिंगे तसेच सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलचा गुणवंत विद्यार्थी पंडित यांचा शाळेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या गुणवत्तेचा गौरव म्हणून ध्वजारोहणाचा मान त्यांना देण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक प्रतिनिधी म्हणून श्री.परशुराम लोखंडे यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वारीस सर यांनी अत्यंत प्रभावी, ओघवत्या आणि उत्साहपूर्ण शैलीत करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. मुख्याध्यापिका सौ .रश्मी रमेश खानविलकर मॅडम आणि सौ.गार्गी मॅडम यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा आणि “देश प्रथम, राष्ट्रसेवा सर्वोच्च” हा संदेश देणारा हा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील, अशा उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली

error: Content is protected !!