आज 14 सप्टेंबर हिंदी दिवस कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कु अमृता पाटील, कु.विधी तिखे यांनी हिंदी कवितांचे छान सादरीकरण केले. इयत्ता ७ वी ची विद्यार्थिनी कु. सलोनी कोरीने हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले. कु.शिवतेज गडदे यांनी विलोमार्थी व समानार्थी शब्द सांगून हिंदी दिवसाची महती विशद केली.शाळेच्या शिक्षिका किरण यादव मॅडम यांनी हिंदी दिवसाचे महत्व व हिंदी दिवस आजच्या दिवशी का साजरा केला जातो याची माहिती दिली. श्री. महेश दहिभाते सर यांनी आभाप्रदर्शन केले, अशा प्रकारे हिंदी दिवस आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
