सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल भांडुप शाळेचा आज २९ वा वर्धापनदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेची संचालक संस्थापक श्री रमेश खानविलकर सर व प्रमुख पाहुणे आर के बीएड कॉलेजच्या प्राचार्य राहुलकर मॅडम या उपस्थित होत्या आदरणीय खानविलकर सर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना आदर्श व सुजाण नागरिक कसे असावेत, शिक्षणातील नव नवीन संकल्पना, आधुनिक शिक्षण पद्धती याविषयी माहिती दिली.त्याचप्रमाणे संस्थेची स्थापना करताना माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले संस्थेला केलेले सहकार्य, मनोहर जोशी साहेब यांनी शाळा स्थापनेसाठी दिलेले योगदान व मागील 28 वर्षे संस्था प्रगतीपथावर नेताना आलेले अडचणीवर कशी मात केली याची माहिती दिली.
आदरणीय श्री. रिद्धेश खानविलकर सर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्तरावरील विविध अभ्यासक्रम, आर. के.सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून केलेले सामाजिक, शैक्षणिक कार्य व आधुनिक शिक्षण पद्धती राबवण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्चुअल क्लासरूम, ई लर्निंग, एज्युकेशनल ॲप, इ लायब्ररी यासंदर्भात माहिती दिली. आर.के. बी. डी कॉलेजच्या प्राचार्या सौ. खिलोनी राऊळकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या विविध योजना, उपक्रम व महाविद्यालयातील विद्यार्थी परदेशात करत असलेले शैक्षणिक कार्य याविषयी माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रश्मी खानविलकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी पूरक मार्गदर्शन वर्ग, शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती मॅडम व आभार प्रदर्शन श्री.संदीप खताळ यांनी केले.