राजारामशेठ विद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, खिंडीपाडा, भांडुप, मुंबई- ७८ शाळेने २८ फेब्रुवारी जागतिक विज्ञान दिन साजरा केला.शास्त्रज्ञानी लावलेले वेगवेगळे शोध यांची महिती देणारा स्लाईड शो प्रथम पडद्यावर दाखवण्यात आला. विज्ञान दिवस २८ फेब्रुवारी रोजी साजरा का केला जातो याची माहिती तसेच देशाचे महान शास्त्रज्ञ सी.व्ही. रामण यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याची माहिती विज्ञान शिक्षिका सौ. शीतल साळुंखे मॅडम यांनी दिली.
इ. ५ वी ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्याना विज्ञान उपक्रम प्रयोग करून दाखविण्यात आले. प्रयोग शाळेतील विविध उपकरणे,साहित्याचा परिचय करून देण्यात आला. इ. ६ वी तील विद्यार्थी कु. शिवतेज गदडे यांनी भविष्यातील दळणवळण या विषयी छान माहिती सांगितली. एलन मास्क यांच्या गाडीची वैशिष्ठ्ये सांगितली. इ. ९ वीतील विद्यार्थ्यानी कु. जानवी सनगले हिने विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली.
विविध विद्यार्थ्यानी चित्रकला, रंगोळी व प्रात्यक्षिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.मोरे मॅडम यांनी २०२२ ची थीम “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोण” यावर आधारित विविध वैज्ञानिक बाबींची माहिती सांगून आजच्या दिवसाचे महत्व आणि आपले विद्यार्थी वैज्ञानिकदृष्ट्या कसे सजग आणि प्रगत होतील याविषयी मार्गदर्शन केले. अशा प्रकारे आमचा विज्ञान दिन उत्साहात आनंदी वातावरणात पार पडला.