30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल खिंडीपाडा भांडुप (प.) मुंबई आयोजित दिनांक १४/११/२०२२ , रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती हा कार्यक्रम पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी खानविलकर मॅडम यांनी मुलांना ,पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवन परिचय याविषयी मार्गदर्शन केले .तसेच श्रीम. ज्योती शिंदे मॅडम यांनी बालदिनाचे महत्त्व सांगितले. कुमार नवाज शेख व कुमार मंगेश वाहूळे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा साकारली होती. विद्यार्थ्यांमधून इयत्ता सहावी चा विद्यार्थी कुमार मंगेश वाहूळे याने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती सांगितली.तसेच इयत्ता पाचवी चा विद्यार्थी नवाज शेख यानी सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगितली . या बालदिनाचे अवचित साधून शाळेमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .शाळेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.