सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय खिंडीपाडा, भांडुप (प.) मुंबई. आज दिनांक ०२/०२/२०२३ वार गुरुवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक श्री रमेश खानविलकर सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री महेश पालकर साहेब शिक्षण संचालक पुणे, ब्रिगेडियर सुधीर सावंत ,माजी खासदार बिपिन विचारे, संदीप जळगावकर, भालचंद दळवी सर व इतर मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सोहळ्यात सहभागी झाले होते.
