सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल भांडुप (प.),मुंबई शाळेत आज राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती भावी पिढीला व्हावी यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी खानविलकर मॅडम यांनी 1894 मधील महाराजांच्या राज्याभिषेकापासून त्यांनी समाजातील मागास जातीतील लोकांसाठी कार्य करत खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकासाची संकल्पना अंमलात आणली, त्यांचे महान कार्य येणाऱ्या सर्वच पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत सामाजिक न्याय स्थापित करून बहुजनांना स्वाभिमानाचे आयुष्य प्रदान करणारे, आरक्षणाचे जनक, १८ पगड जाती शिकल्या तरच टिकतील हे सत्यात साकार व्हावे म्हणून समाजातील सर्व दुर्बल,मागास, शोषित वर्गातील मुलांसाठी वस्तीगृह, शाळा, कॉलेज उभारणारे शिक्षण महर्षी. अस्पृश्य गणपत कांबळेला हॉटेल काढून देऊन तेथे रोज चहा पाणी घेऊन सामाजिक समतेचा,बंधुतेचा आदर्श स्थापन करणारे करते सुधारक,राधानगरी धरण उभारून कोल्हापूर संस्थान सुजलाम, सुफलम करणारा लोकराजा. २६ जून लोककल्याणकारी राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मोत्सव दिनी विनम्र अभिवादन व भावी पिढीने शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा असे मार्गदर्शन मॅडमनी केले.
कु.समीक्षा पवार व कु.आश्विनी थोरात यांनी राजर्षी शाहू महाराज यांचा जीवन परिचय व कार्य सांगितले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.भारत नरळे सर यांच्यामार्फत करण्यात आले.
