सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल भांडुप (प.),मुंबई शाळेत आज आषाढी एकादशी चा कार्यक्रम अतिशय उत्साह मध्ये साजरा करण्यात आला. शाळेमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी संप्रदायाचा पारंपरिक वेष परिधान करून आलेले,हाती टाळ, कपाळी केशरी गंध,अबीर. विठ्ठल व रखुमाई यांच्या रुपात विद्यार्थ्यांनी दर्शन दिले.
सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा
मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रश्मी खानविलकर मॅडम यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या दिंडीचे पूजन करण्यात आले. विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिंडीची सुरुवात भगवा पताका हाथी धरून ,टाळ वाजवत ,पांडुरंगाच्या नामघोषात खानविलकर मॅडम यांनी करून दिली. शाळेच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात आरती कार्यक्रम होऊन, खिंडीपाडा गणेश मंदिर ,राधाकृष्ण मंदिर, शास्त्रीनगर येथील साईबाबा मंदिर, अमर नगर बस स्टॉप जवळील विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी झान्ज, लेझीम खेळून, मंदिरात अभंग घेण्यात आले व आरती घेण्यात आली. अशा प्रकारे बालगोपाळांची ,बाल वारकऱ्यांची पायी दिंडी अतिशय आनंदी व भक्तिमय वातावरणात शाळेत परतली. वरून राजाने देखील आम्हाला चांगली साथ दिली.शाळेत विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.