आर.के.बी एड कॉलेज भांडुप येथे स्वच्छता पंधरवडा दिन साजरा
————————————————
मुंबई-भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर.के.बी एड आणि डी एड कॉलेज,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीने स्वच्छता पंधरवडा मधील पहिला दिवस साजरा करण्यात आला.महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या रावते कंपाऊंड, रमाबाई नगर १, या ठिकाणी जाऊन साफसफाई, आरोग्य, स्वच्छते बाबत माहिती दिली आणि स्वच्छता केली. आपल्या आसपासचा परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी याकरिता विद्यार्थ्यानी संपूर्ण परिसरात स्वच्छते बाबत माहिती दिली. या स्वच्छता मोहिमेत विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
