30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय ,सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय. भांडुप या ठिकाणी आज दिनांक:- 23 डिसेंबर 2023, वार- शनिवार रोजी पालक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्व पालकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खानविलकर मॅडम यांच्या हस्ते क्रीडांगणाची पूजा करण्यात आली. प्राध्यापक अमोल सर यांनी श्रीफळ वाढवले. शाळेमध्ये बुद्धीला चालना देणारे, साहसी खेळ खेळवण्यात आले.तळ्यात- मळ्यात, फुगे फुगवणे, स्मरणशक्ती, नाणी ओळखणे ,फुंकर मारून ग्लास पुढे नेणे असे खेळ खेळण्यात आले. पालकांनी देखील लहान होऊन मनसोक्त या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून आजच्या या स्पर्धेला छान असा प्रतिसाद दिला.खेळ खेळल्याने मानवी मनाला व बुद्धीची चालना मिळते. शारीरिक क्षमता वाढून शरीर निरोगी राहण्याचे एक महत्त्वाचे माध्यम खेळ आहे. त्याचप्रमाणे संघभावना, सहकार्य, वेळेचे नियोजन अशा अनेक विविध बाबींचा लाभ या खेळातून होत असतो. या सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये ज्योती मॅडम यांनी व गुलाब मॅडम यांनी पंच म्हणून कार्य पाहिले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप छान सहकार्य केले. अशाप्रकारे आजचा पालक क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम अतिशय आनंदी उत्साही वातावरणामध्ये पार पाडण्यात आला.

error: Content is protected !!