30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय ,सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय. भांडुप या ठिकाणी आज दिनांक:- 30 डिसेंबर 2023, वार- शनिवार रोजी विद्यार्थ्यानी स्वतःच्या वैचारिकतेतून, कल्पना वापरून बनवलेल्या विविध विषयांचे शैक्षणिक साहित्य ,उपक्रम , मॉडेल बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन माझे कौशल्य विद्यार्थी कलागुणांचा आविष्कार अंतर्गत आयोजित करण्यात आले होते. या शैक्षणिक उपक्रमास शाळेच्या इंग्रजी व मराठी माध्यम शाळेच्या पालकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खानविलकर मॅडम यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रदर्शन सभागृहातील प्रवेशाची फित कापून करण्यात आली. शाळेमध्ये शिक्षकांसाठी बुद्धीला चालना देणारे, साहसी, मनोरंजनात्मक खेळ खेळवण्यात आले. जास्तीत जास्त रुपयांची नाणी जमा करणे, कप आणि प्लेटच्या साह्याने पिरॅमिड बनवणे, नाणी उचलणे, स्मरणशक्ती ,क्रिकेट असे खेळ खेळण्यात आले. खेळ खेळल्याने मानवी मनाला व बुद्धीची चालना मिळते. या सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये व शैक्षणिक प्रदर्शनामध्ये ज्योती मॅडम यांनी यांनी पंच म्हणून कार्य पाहिले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप छान सहकार्य केले. अशाप्रकारे आजचा माझे कौशल्य विद्यार्थी कलागुणांचा आविष्कार कार्यक्रम अतिशय आनंदी उत्साही वातावरणामध्ये पार पाडण्यात आला.