30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय आणि आर.एस कनिष्ठ महविद्यालय ,सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल ,खिंडीपाडा .भांडुप या ठिकाणी आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.अमोल चितारे सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी अमृता पोपट पाटील हिने खूप छान स्वरूपात दिली .सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणामध्ये उपस्थित असताना त्यांना सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे शिक्षणाचे महत्त्व व शिक्षण पूर्ण करून घेण्याची एक प्रतिज्ञा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .रश्मी खानविलकर मॅडम यांनी दिली. जीवनामध्ये शिक्षण घेण्यासाठी सावित्रीबाईंना अनेक अडचणींना कशा पद्धतीने सामोरे जावे लागले,त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाद्वारे मुलींमध्ये कशा पद्धतीने जागृती घडून आणली, समाज प्रबोधन केले याची माहिती दिली. सावित्रीबाई यांना भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखले जाते. सावित्रीबाईंनी समाजात घडून आणलेल्या सामाजिक व वैचारिक प्रबोधनाची माहिती खानविलकर मॅडम यांनी दिली .श्री संदीप खताळ सर यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनकार्याची माहिती सांगून सावित्रीबाईंनी पुणे येथे १८४८ ते १८५२ पर्यंत एकूण १८ शाळा काढल्या. १८५४ सावित्रीबाईंचा काव्य फुले हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना स्वतःच्या घरातच केली.सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाईंचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो अशा प्रकारे अतिशय उत्साही व आनंदी वातावरणामध्ये सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त बालिका दिन आमच्या शाळेत साजरा करण्यात आला.

विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावून ,तिचा साठा ज्या पाशी तो ज्ञानीमा नीतीजन