30 Years of Growth in Education.

रस्ता सुरक्षा अभियान मुंबई-२०२४ अंतर्गत रस्ता सुरक्षेच्या नियम संदर्भात मार्गदर्शन व उपाय या संदर्भात मुलुंड व भांडुप विभागातील शाळांमध्ये निबंध , चित्रकला , घोषवाक्य स्पर्धा व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती .या सर्व स्पर्धांमध्ये सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला होता .यातील चित्रकला स्पर्धेमध्ये राजाराम शेठ विद्यालयाची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी .तन्वी रवींद्र लांजेकर हीस चित्रकला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सदर कार्यक्रम श्री. सुळे साहेब पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग मुलुंड यांच्या मार्गदर्शनानुसार श्री.सूर्यवंशी सर पीएसआय ,श्री. राठोड सर पीएसआय ,सौ. गर्जे मॅडम पीएसआय मुलुंड वाहतूक विभाग व श्री.कदम साहेब पोलीस हवालदार मुलुंड वाहतूक विभाग या अधिकारी वर्गांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्री.कदम साहेब यांनी रस्ता सुरक्षा अभियाना संदर्भातील प्रमुख नियम, आपली जबाबदारी यांची माहिती दिली. गर्जे मॅडम यांनी रस्ता सुरक्षा म्हणजे रस्त्यावरील अपघात टाळणे ,प्रवास करताना लोकांना अडथळा होणार नाहि याची काळजी घेणे.लोकांचा जीव वाचवण्यासाठी केलेली उपाययोजना .पादचारी ,दुचाकी चार चाकी वाहने आणि इतर वाहनांना नियमांची माहिती करून देणे होय ही माहिती दिली. सदर कार्यक्रम एन .इ. एस.रत्नम कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स,NES कॉम्प्लेक्स, भांडुप (वेस्ट) मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. वरील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.खानविलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार श्री. संदीप खताळ सर यांनी रस्ता सुरक्षा अभियान विषय संदर्भातील माहिती दिली.