30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय ,सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल ,आर.एस. जुनियर कॉलेज ( पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग च्या ) वतीने आज शाळेमध्ये आषाढी एकादशीचा दिंडी उत्सव अतिशय आनंदी वातावरणात पार पडण्यात आला. हिंदू धर्मात एकादशी उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आहे आणि नियंत्रणा द्वारे त्याला आध्यात्मिक प्रगती कडे वळवणे असे आहे. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत कालावधी वर्ज कालावधी मानला जातो.

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा
सोहळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा

शाळेत सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी वारकरी पोषखात उपस्थित राहिले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.खानविलकर मॅडम यांच्या हस्ते दिंडीपूजन ,पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शालेय प्रांगणातील सिद्धिविनायक मंदिरात आरती घेऊन पालखी प्रस्थान झाले,शालेय परिसरातील मंदिरांमध्ये गणपती मंदिर ,राधाकृष्ण मंदिर, अमर नगर येथील विठ्ठल मंदिरामध्ये पालखी सोहळा उत्तम प्रकारे रंगला. विठ्ठल मंदिरामध्ये विद्यार्थ्यांनी अभंग बोलून विठू नामाचा जयघोष केला.विठ्ठल मंदिरानंतर पालखी सोहळा शांती निकेतन येथील भगवान शंकर यांच्या मंदिरात येऊन त्या ठिकाणी आरती व अभंग घेतले घेण्यात आले ,तेथून सर्व विद्यार्थी शिक्षक, पालक हे शाळेत आले. दिंडीचे ठिकठिकाणी भाविकांनी स्वागत व पूजन करण्यात आले. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद व खाऊ वाटप करण्यात आले .या दिंडी सोहळ्यास भांडुप पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री.उमाकांत कर्डले तसेच सतीश बारसे महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF)यांचे योगदान लाभले. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.अशाप्रकारे आमचा आषाढी एकादशीच्या दिंडी सोहळा मुख्याध्यापिका सौ. खानविलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार अतिशय उत्साही व आनंदवर्धक वातावरणात पार पडण्यात आला.