30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल. खिंडीपाडा, भांडुप. मुंबई च्या वतीने भांडुप पोलीस स्टेशन या ठिकाणी राखी पौर्णिमेचा (रक्षाबंधन )सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस मुंबई पोलीस सतत जागता पहारा करणारे नियमित स्वतः च्या जीवाची परवा न करता ऊन ,वारा, थंडी, पाऊस अशा नैसर्गिक आपत्ती, आंतकी कारवाया अशा मानवी आपत्ती सर्वांचा सामना करणारे आमचे मुंबई पोलीस, आपण मुंबई शहराचे रक्षणकरतै आहात. भांडुप पोलीस स्टेशन हे देखील त्यांच्याच एक भाग आहे. बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन मात्र सदैव ऑन ड्युटी असलेल्या आमच्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायद्यास्वस्त राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. सतत आपल्या कामांमध्ये त्यांना व्यस्त रहावे लागत असते. ऑन ड्युटी 24 तास कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे लागत असते ,अशा आमच्या पोलीस बांधवांसाठी राजाराम शेठ विद्यालय खिंडीपाडा भांडुप शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी रमेश खानविलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या पोलीस भाऊरायांना राखी बांधून हा सण साजरा केला, पोलिसांप्रती आदराची, आत्मियतेची व आपलेपणाची भावना यातून व्यक्त करण्यात आली.