30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, खिंडीपाडा,भांडुप. मुंबई या ठिकाणी आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ वार गुरुवार शाळेत मोठ्या उत्साहाने “मराठी राजभाषा दिवस” साजरा करण्यात आला.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

लहान शिशु ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी खानविलकर मॅडम यांनी मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे प्रसिद्ध सिने कलाकार, नाटककार श्री सचिन मंडले व श्री सचिन भिलारे यांनी विद्यार्थ्यांसमोर अभिवाचन सादर केले, तसेच मराठी भाषा आपण कशी जिवंत ठेवली पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कविता नाटक बोधकथा वेशभूषा यांचे सादरीकरण केले श्रीमती ज्योती शिंदे मॅडम यांनी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.