सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, खिंडीपाडा,भांडुप. मुंबई आज दिनांक ०८ मार्च २०२५ वार शनिवार रोजी भक्ती शक्ती व्यासपीठ आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सवासाठी इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना 21 संत व योगी पुरुषांच्या मूळ पादुकांच्या दर्शनासाठी NSCI डोम, वरळी, मुंबई या ठिकाणी सादर निमंत्रित करण्यात आले. श्री गुरु पादुका दर्शन उत्सव या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री ( महाराष्ट्र राज्य ) व विशेष उपस्थिती व प्रबोधन माननीय श्री प्रल्हाददादा वामनराव पै (जीवन विद्या मिशन) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या श्री गुरु पादुका दर्शनाचा लाभ घेतला. या ठिकाणी महाराष्ट्रात होऊन गेलेले महान संत यांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.
