ना. रामदास आठवले. मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार पद्मश्री उज्वल निकम यांच्या प्रमुख उपस्थित
आर. के. विधी महाविद्यालयाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा व “Stormy path”इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन
भांडुप(प) येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर. के. विधी महाविद्यालयाचा दिमाखदार राजेशाही उद्घाटन सोहळा व रमेश खानविलकर यांच्या इंग्रजी जीवन चरित्र Stormy path पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले, राष्ट्रपती नवनियुक्त राज्यसभा सदस्य पद्मश्री उज्वल निकम, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे अध्यक्ष विठ्ठल कोंडे देशमुख, आमदार अशोक पाटील, शिवसेना सचिव राम रेपाळे ,प्रकाशक अक्षय सोन्थालिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
विधी महाविद्यालय उद्घाटन सोहळा व Stormy path या इंग्रजी पुस्तक प्रकाशनास मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,मा.मंत्री नितेश राणे, मा. मंत्री आदिती तटकरे ,ना. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शुभेच्छापत्र देऊन रिद्धेश रमेश खानविलकर यांचे अभिनंदन केले आहे
याप्रसंगी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदासजी आठवले म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी द पीपल एज्युकेशन शिक्षण संस्थेची स्थापना करून गोरगरीब, दलित ,मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. द पीपल एज्युकेशनच्या अनेक शाळा महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच धर्तीवर रमेश खानविलकर यांनी गेले ३१ वर्ष अनेक शाळा महाविद्यालय स्थापन करून गोरगरीब, दलित, मागासवर्गीयांना शिक्षणाची सुविधा निर्माण करून देत आहेत. संपूर्ण खानविलकर कुटुंबीय शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा सुपुत्र रिद्धेश खानविलकर तो वसा पुढे चालवत आहे.ही बाब महाराष्ट्रातील तरूणांना प्रेरणा देणारी आहे.
राष्ट्रपती नवनियुक्त राज्यसभा खासदार पद्मश्री उज्वल निकम म्हणाले की, मुंबईत विशेषता ईशान्य मुंबईत विधी महाविद्यालयाची नितांत आवश्यकता होती. याबाबत परिपूर्ण अभ्यास करून रिद्धेश खानविलकर यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य मुंबईत आर. के. विधी महाविद्यालयाची उभारणी केली याचा फायदा अनेकांना होणार आहे. नवीन विधी महाविद्यालय सुरू करणे सामान्य बाब नाही, अनेक बाबींची पूर्तता करावी लागते हे ‘शिव धनुष्य’ रिद्धेश खानविलकर सारख्या मराठी युवकाने समर्थपणे पेलले याचा मला अभिमान आहे.त्याचातील विनम्रता मला भावली आहे.
याप्रसंगी प्रकाशित झालेले रमेश खानविलकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित “Stormy path ”हे पुस्तक अनेकांना मार्गदर्शन ठरणार आहे. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले म्हणाले की. रिद्धेश खानविलकर आमच्या कोकणातील उच्चशिक्षित मराठी तरुणाने मुंबई सारख्या शहरात वडिलांकडून आदर्श घेऊन विधी महाविद्यालयाची सुरुवात करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. मा.उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या कार्यक्रमाला येणार होते पण पुण्यात एका शासकीय कार्यक्रमात ते असल्याने वेळेत ते पोहोचू शकले नाहीत. त्यांच्या वतीने मी आश्वासन करतो, रिद्धेश खानविलकर तुम्ही मुंबई शहरात संस्था काढल्यात तशा कोकणात विशेषता माणगाव, महाड,पोलादपुर या परिसरात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षण संस्था सुरू कराव्यात. मी व आपले शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू कोकणच्या विकासासाठी याची गरज आहे. .
ईशान्य मुंबईतील अनेक वकील,डॉक्टर,प्राध्यापक,शिक्षक ,पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक,सर्व पक्षाचे पदाधिकारी प्रचंड प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शुभेच्छा सह
आर.के. विधि महाविद्यालयाच्या रुपाने ईशान्य मुंबईचा शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी
भांडुप (प)सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडल संचालित आर.के. विधि महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले, राष्ट्रपती नवनियुक्त राज्यसभा खासदार पद्मश्री अॅड.उज्वल निकम,मा. ना. भरत शेठ गोगावले ,मंत्री रोजगार हमी योजना,श्री विठ्ठल कोंडेदेशमुख ,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ,शिवसेना सचिव राम रेपाळे ,आमदार अशोक पाटील अनेक वकील,डॉक्टर,प्राध्यापक, प्रतिष्ठित नागरिक,सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री आशिष शेलार, मा. मंत्री नितेश राणे ,मा मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मा. मंत्री अदिती तटकरे यांनी उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा पत्र पाठवून रिद्धेश रमेश खानविलकरांचे अभिनंदन केले आहे
संस्थेचे संस्थापक, संचालक रमेश खानविलकर यांनी ३१ वर्षात संस्थेनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या अनेक शाळा, विद्यालये , व्यावसायिक , शैक्षणिक संस्थांची माहिती देऊन भविष्यात कोकणात मोठे शैक्षणिक संकुल उभे राहणार आहे. ज्याचा फायदा संपूर्ण कोकणवासीयांना पर्यायाने महाराष्ट्राला होईल असे सांगितले.
केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की रमेश खानविलकर ३१ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करत असून आता त्याचा पुत्र रिद्धेश खानविलकर यांनी नवीन आर. के. विधी महाविद्यालय सुरू करून त्याचा शैक्षणिक वसा पुढे सुरू ठेवला आहे. मला खानविलकर कुटुंबीयांचा व त्यांच्या शैक्षणिक संस्थांचा अभिमान आहे, कारण त्यांच्या संस्थेतून गोरगरीब, दलित, मागासवर्गीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन स्वावलंबी होत आहे.
पद्मश्री व राष्ट्रपती नियुक्त नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य अॅड. उज्वल निकम आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपण जे पेरतो तेच उगवेल रमेश खानविलकर यांनी गोरगरिबांसाठी ३१ वर्ष सातत्याने शिक्षणाचा ‘यज्ञ’ अखंडपणे सुरू ठेवला आहे. आता रिद्धेश खानविलकर त्यांनी सुरू ठेवला आहे यज्ञाला ‘महायज्ञाची रूप’ देण्यासाठी आर .के. विधी महाविद्यालय सुरू केले. खरंच मला अभिमान आहे की. रिद्धेश खानविलकर सारखा मराठी उच्चशिक्षित युवक आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन समाजासाठी शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संस्था स्थापन करतो आहे. अशा तरुणाची महाराष्ट्राला गरज आहे.
ना. भरतशेठ गोगावले रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आमच्या कोकणातील खानविलकर कुटुंबीयांनी मुंबईसारख्या शहरात शिक्षण संस्था स्थापन करू शाळा, महाविद्यालये , व्यावसायिक अभ्यासक्रम संस्था यशस्वीरित्या सुरू ठेवल्या आहेत. भविष्यात नवी संस्था स्थापनेचा प्रयत्न करत आहे रिद्धेश खानविलकर यांनी ईशान्य मुंबईत ज्याप्रमाणे नवीन महाविद्यालय सुरू केले त्याप्रमाणे एखादे वैद्यकीय किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे महाविद्यालय किंवा कौशल्य विद्यापीठाची स्थापना कोकणात देखील करावी रिद्धेश खानविलकर यांना सरकारकडून संपूर्ण मदत मी मिळवून देईल उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे स्वत: आजच्या कार्यक्रमास येणार होते पण पुण्यात कार्यक्रमाला वेळ लागल्याने ते वेळेत पोहचू शकले नाहीत.पण ते खानविलकर कुटुंबियांसोबतच आहेत.
श्री विठ्ठल कोंडे देशमुख अध्यक्ष बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा म्हणाले की, माझ्या ईशान्य मुंबईत नवीन विधी महाविद्यालय सुरू होत आहे याचा मला अभिमान आहे.सर्व मान्यवरांना विधी महाविद्यालयाचे सन्मान चिन्ह देऊन रिद्धेश खानविलकर यांनी सन्मानित केले. रश्मी खानविलकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.



























































































































































