30 Years of Growth in Education.

मुंबईतील वरळी डोम येथे दिनांक २१ मार्च २०२६, शनिवार रोजी अत्यंत भक्तिमय आणि भावस्पर्शी असा “श्री गुरु पादुका दर्शन उत्सव सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. या दिव्य सोहळ्याचे आयोजन सकाळ माध्यम समूह यांच्या वतीने करण्यात आले होते.
या पवित्र उत्सवामध्ये राजाराम शेठ विद्यालय (मराठी माध्यम, खिंडीपाडा भांडुप) व सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल (खिंडीपाडा भांडुप) येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने प्रत्यक्ष सहभाग घेतला. शालेय गणवेशात सज्ज झालेले विद्यार्थी सकाळी लवकर वरळी येथे पोहोचले आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत दुपारी सुरक्षितपणे शाळेत परतले.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील संत परंपरेचा दिव्य वारसा अनुभवण्याची सुवर्णसंधी लाभली. त्यांनी गजानन महाराज, संत तुकाराम, संत कान्होपात्रा, संत गोंदवलेकर महाराज, साई बाबा, स्वामी समर्थ, संत सावता माळी यांसह अनेक संतांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले. या दर्शनातून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि मन:शांतीचा अद्भुत अनुभव मिळाला.
हा संपूर्ण सोहळा संस्थेचे संचालक श्री रमेश खानविलकर सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वृंदा राजाराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. तसेच सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष श्री रिद्धेश रमेश खानविलकर सर यांनी वेळोवेळी केलेल्या सूक्ष्म नियोजन व योग्य मार्गदर्शनामुळे हा भव्य पादुका दर्शन सोहळा निर्विघ्न व यशस्वी ठरला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, श्रद्धा आणि अध्यात्मिक जाणीव अधिक दृढ झाली असून अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात यावे, अशी भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!