भांडुप, ३ सप्टेंबर २०२६ : बालरंगभूमी परिषदेतर्फे विद्यार्थ्यांसाठी लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गुरुवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी राजाराम शेठ विद्यालय व सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल येथे करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व लोकपरंपरांची ओळख करून देणे तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे हा होता. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध लोककला प्रकारांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विश्वास धुमाळ सर व श्री. महेश कापडोस्कर उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी रमेश खानविलकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्रीमती ज्योती योगेश शिंदे, श्री. संदीप खताळ सौ. गुलाब गुरव व प्रणाली घाडीगावकर यांनी विद्यार्थ्यांना लोककलेविषयी माहिती दिली.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना लोककलेचे महत्त्व सांगून आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे हे शिबिर अत्यंत आनंददायी व मार्गदर्शक ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद व संबंधित सर्वांचे सहकार्य लाभले.



