30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजाराम शेठ विद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल व आर. एस. ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राजाराम शेठ विद्यालयाच्या प्रांगणातील मैदानावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दहीहंडी पूजनाने करण्यात आली. राजाराम शेठ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर मॅडम व सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका गार्गी पवार मॅडम यांच्या शुभहस्ते दहीहंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि सहकार्याची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मुलींसाठी स्वतंत्र दहीहंडी आणि मुलांसाठी स्वतंत्र दहीहंडी आयोजित करण्यात आली होती.
मुलींच्या दहीहंडीच्या उपक्रमात शाळेतील सर्व महिला शिक्षिकांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य केले. त्याचप्रमाणे मराठी व इंग्रजी माध्यमातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दहीहंडी लावण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शाळेच्या प्रांगणात उत्साह, आनंद आणि जल्लोषाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत दहीहंडीचा आनंद लुटला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक सहभागामुळे संपूर्ण परिसर आनंदमय व प्रसन्न झाला.
दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा उपक्रम नसून एकता, सहकार्य, संघभावना, धैर्य आणि परस्परांना साथ देण्याचा संदेश देणारा सांस्कृतिक उत्सव आहे. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील पारंपरिक सणांची ओळख व्हावी, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मराठी व इंग्रजी माध्यमातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सहभाग घेतल्यामुळे एकात्मता, बंधुभाव आणि सांस्कृतिक समन्वयाचे सुंदर दर्शन घडले.
अत्यंत उत्साही, आनंददायी आणि प्रसन्न वातावरणात दहीहंडी उत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह आणि सहभाग हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे जतन, परंपरांचा आदर, संघभावना, सहकार्य, आत्मविश्वास आणि सामाजिक एकतेची मूल्ये रुजविण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला.
“परंपरेचा वारसा जपूया, संस्कृतीची पताका उंचावूया आणि एकतेच्या बंधनात सर्वांना जोडूया!”

error: Content is protected !!