30 Years of Growth in Education.

राजाराम शेठ विद्यालया ची स्थापना सन १९९५ रोजी श्री रमेश श्रीराम खानविलकर यांनी केली या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा मुंबईमधील भांडुपमध्ये आदिवासी पाड्यात व दलित वस्ती मध्ये आहे गरजू, गरीब व मध्यम वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी या शाळेची स्थापना केली.

या शाळेला महाराष्ट्र शासनाची इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांना एकत्रित एकाचवेळी मान्यता मिळाली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेची इयत्ता पहिली ते चौथी या वर्गांना मान्यता आहे तसेच ज्युनियर कॉलेज आर्ट्स, कॉमर्स,सायन्स, यांनाही परवानगी मिळाली आहे.पूर्व प्राथमिक स्तरापासून ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ही आमची शाळा पूर्ण करते.

आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आहे तेथे विद्यार्थ्यांचे ज्ञान व छंद यांना प्रेरणा दिली जाते. तसेच छोटे सभागृह देखील आहे तेथे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना मार्गदर्शन आमचे शिक्षक वर्ग करतात. तसेच प्रयोगशाळा, संगणक कक्ष देखील आहे.खेळासाठी मोठे मैदान देखील आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत इतर विविध प्रकारचे ज्ञान देतो व त्यांना त्यासाठी प्रोत्साहित करतो.

आमचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा जसे शिष्यवृत्ती,प्रज्ञाशोध परीक्षा, चित्रकला ( एलिमेंट्री व प्री एलिमेंटरी ) मध्ये भाग घेतात व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस यश मिळवतात दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यामुळे शिष्यवृत्ती मिळाली आहे व त्यांचा उपयोग त्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी होत आहे. आमचे मिशन शैक्षणिक,व्यवसायिक आणि श्रमिक कार्यक्षमतेच्या उच्च मानकांवर ताण देऊन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक, शारीरिक आणि मनोरंजक गरजा पूर्ण व्हावे.

आमचे असेही मिशन आहे की या समाजाने या शहरातील सामान्य माणसाच्या शैक्षणिक गरजा प्रामाणिकपणे पूर्ण केल्या पाहिजे.

कृपया आपले दृष्टिकोन आमच्यासह शेअर करा आणि आपल्या मुलांना आमच्या कुटुंबात दाखल करा आमच्या शाळेच्या कुटुंबाने आपल्या कुटुंबाच्या विस्तार व्हावा अशी आमची इच्छा आहे शैक्षणिक शिक्षण व वाडी आमची मुख्य ओळख आहे तरीही विद्यार्थ्यांना सुशिक्षित करणे म्हणजे संपूर्ण लक्ष देणे आणि त्यांच्या सामाजिक आणि भावनिक कल्याण याविषयी काळजी घेणे हे आमचे ध्येय आहे.

शाळेची संपूर्ण माहिती

  • लहान शिशू
  • मोठा शिशू
  • इ. १ ली ते १० वी
  • सेमी इंग्लिश
  • कनिष्ठ महाविद्यालय

शाळेची वैशिष्ट्ये

  • ई-लर्निंग सुविधा
  • अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद
  • सुसज्ज व स्वच्छ इमारत
  • उज्ज्वल भवितव्य आम्ही घडवतो…सगळ्या वर्गात प्रवेश
  • लवकरच… डिजिटल प्रारंभ
  • संगणक व विज्ञान प्रयोगशाळा
  • आधुनिक शिक्षण पद्धती
  • उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा स्पर्धा आयोजन
  • दर महिन्याला विद्यार्थाच्या प्रगतीसाठी शाळा पालकांबरोबर चर्चा व सभा

संकूल

आमचे स्कूल कॅम्पस मुंबईतील हिरवागार उपनगरात आमच्या शाळेचे कॅम्पस म्हणजे एक आदर्श आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या इमारती सुरक्षित आणि सुंदर आहेत.आम्ही परिपूर्ण शिक्षणासाठी परिपूर्ण परिसर प्रदान करतो. शाळेच्या प्रवेश व्दारातून आत येताच परिसरात विचारवंतांचे विचार मोठ्या मुलांसाठी, व लहान वर्गांसाठी त्यांच्या योग्यतेची व आवडीची अशी छायाचित्रे रंगरंगोटी केली आहे. तसेच शाळा ही डोंगरावर असल्यामुळे शाळेत येताना ज्या पायर्‍या चढाव्या लागतात त्या प्रत्येक पायरीवर आमच्या शाळेचे ध्येय व शाळा काय देते हे सुविचार लिहिलेले आहेत प्रत्येक शाळेच्या दिवशी आमचे शिक्षक प्रत्येक मुलासाठी एक रोमांचक आणि प्रेरणादायक शिक्षण अनुभव तयार करण्याचा प्रयत्न करतात

आमचे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी त्यांच्या सर्जनशील कलागुणांना समर्पित करा आणि घाला दुसर केंद्रात आणि आयटी होऊन व स्वतंत्र क्रीडा धोरणाचा लाभ घेतात आमचे माध्यमिक शाळेच्या सुविधा विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी तयार केले आहे कारण ते विविध विषयावर प्रावीण्य मिळवता मिळतात विज्ञान तंत्रज्ञान संगणक तंत्र कला आणि डिझाइन संगीत नाटक यासाठी होल आहे आमची विनंती आहे की आपण आपल्या मुलांच्या या भविष्य व सुरक्षिततेची खात्री घ्यावी.

मुख्याध्यापिका

माझी शाळा म्हणजे एक कुटुंब आहे. आमची भूमिका केवळ येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट ज्ञान देणे त्यांच्या गुणांना वाव देणे त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवणे त्यांना एक सुजन नागरिक बनविणे जेणेकरून समाजात वावरताना त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये व आल्या तरी त्यावर मात करण्याची क्षमता हे गेली पंचवीस वर्ष आम्ही व आमचे शिक्षक सतत येणाऱ्या बदलाचा परिपूर्ण पणे अभ्यास करून ते शैक्षणिक बदल व त्या विषयाची माहिती विद्यार्थ्यांनपर्यंत सोप्या पद्धतीने कशी देता येईल याची काळजी घेतो व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक नवीन वातावरण निर्मिती करतात जिथे मुलांना आपल्या गुणांच्या क्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहित व प्रेरित केले जाते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कला कौशल्य क्षमता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते आमचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे बालकेंद्री करणे प्रोत्साहित क्रिया कल्पनांवर आधारित शिक्षण आणि वैज्ञानिक स्वभाव आमच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी हे प्राथमिक लक्ष आणि म्हणूनच प्रत्येक मुले शिकण्याच्या प्रक्रियेत सामील होते.

शैक्षणिक उत्कृष्टता हा आमचा मोठा भर असला तरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यासाठी उद्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी व त्यांना सामाजिक दृष्ट्या प्रासंगिक राहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी देखील शाळा एकनिष्ठ आहे.

मुलांच्या भवितव्याचा आकार घडविण्यामध्ये पालक सर्वांत सामर्थ्यशाली शक्ती आहेत. त्यांचे सातत्यपूर्ण समर्थन आम्हाला अधिकाअधिक सामर्थ्य देते त्यांच्यावरील विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानते

मला खात्री आहे की शाळा दिवसेंदिवस स्वतःला बळकट करील आणि शाळेच्या भव्यतेत एक नवीन पान भरतील.

शाळेतील सह अभ्यासक्रमाची सूची

विद्यार्थ्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी शाळेत विविध प्रकारचे सह अभ्यासक्रम उपक्रम ठेवले जातात या उपक्रमाची निवड मुलांचे कौशल्य वाढू शकते आणि त्यांना गुंतवून ठेवू शकतो

आमच्या शाळेतील सहल अभ्यासक्रमाचे विविध प्रकार

  1. शैक्षणिक संबंधित शालेय मासिकांचे संपादक कथालेखन वाद-विवाद प्रदर्शनांचे आयोजन चार्ट तयार करणे काव्य इत्यादी
  2. विश्रांती संबंधित मॉडेल बनवणे नाणे संकलन मुद्रांकन संकलन संग्रहालय बांधकाम इत्यादी बागकाम इत्यादी
  3. सामाजिक विकास संबंधित औटींग आणि मार्गदर्शक शाळा परिषदेचे उपक्रम
  4. सहल आणि धमँ संबंधित गिर्यारोहण विशेष होती ट्रेनिंग ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना भेट देणे शारीरिक संबंधित मैदानी आणि इंडोर गेम्स मार्क ड्रील एनसीसी
  5. सांस्कृतिक विकास संबंधित नृत्य संगीत लोकनृत्य लोकगीते फॅन्सी ड्रेस स्पर्धा इत्यादी
  6. नागरी मुले संबंधित विशेष दिवसांचा उत्सव स्वच्छता सप्ताह शिबिरांचे आयोजन
  7. कला आणि हस्तकला संबंधित अल्बम बनवणे बाहुली बनवणे पाक कला छायाचित्रण फुलांची सजावट विडणी

मुलांना वर्गात जाण्याचा आनंद घ्यावा हे लक्षात घेऊन सह अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे आपल्या मुलांच्या दडलेल्या कलागुणांना जोपासण्यासाठी शाळेतील उपक्रमांमध्ये गुंतणे हा एक उत्तम मार्ग आहे

शाळेचा निकाल

वर्ष शाळेचा निकाल विद्यार्थ्यांची नावे टक्केवारी
मार्च १९९९ ६०.००% जनाबाई सोपान वाळूंज ५०.८०%
मार्च २००० ७४.२८% संदीप लक्ष्मण परब ४४.५३%
मार्च २००१ ७१.०५% पल्लवी रविंद्र जाधव ६७.३३%
मार्च २००२ ७५.००% श्रीकांत बाळू दांगट ६२.२६%
मार्च २००३ ५७.१४% प्रशांत रविंद्र जाधव ८२.५३%
मार्च २००४ ६२.५०% शिवाजी वसंत जगताप ५७.७३%
मार्च २००५ ९३.३३% किशोर बाळू पगारे ७८.६६%
मार्च २००६ ८३.३३% अनिल बिरमल पिंजारी ७७.३३%
मार्च २००७ ८५.७१% गणेश ताराचंद चव्हाण ७९.०७%
मार्च २००८ ८८.८८% प्रियांका प्रभाकर मोरे ७६.१५%
मार्च २००९ ७१.४२% अभिजित दत्तू लेंगरे ७५.८४%
मार्च २०१० १००% मयूर दत्ताराम भाताडे ८६.७३%
मार्च २०११ ८७.५०% पूनम पांडुरंग वाघमोडे ९३.४५%
मार्च २०१२ ८४.२१% शाहरुख सिकंदर अखतार ८७.४५%
मार्च २०१३ ९५.२४% सचिन पांडुरंग वाघमोडे ९२.८०%
मार्च २०१४ १००% दक्षता मनोहर बंदरकर ९२.४०%
मार्च २०१५ ९६.८८% प्रज्ञा जालिंदर काळे

गिरिष गजानन पोटे

८९.४०%
मार्च २०१६ ९०.४८% समीर सिकंदर अखतार ८७.००%
मार्च २०१७ ८६.११% धनश्री अशोक शिंगोटे ८२.६०%
मार्च २०१८ ८१.२५% प्राजक्ता धनाजी पाटील ८८.००%
मार्च २०१९ ८३.८७% चित्रा सखाराम चौधरी ८१.४०%
मार्च २०२० १००% कशिश रमेश गावडे ८९.२०%
मार्च २०२१ १००% हर्षदा विठ्ठल नरूटे ९५.४०%