सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय खिंडीपाडा, भांडुप (प.) मुंबई. दिनांक ०४/०२/२०२३ वार शनिवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक श्री रमेश खानविलकर सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी खानविलकर मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री संदीप संगवे शिक्षण उपसंचालक बृहन्मुंबई विभाग, मा. नितीन दळवी विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र शासन, मा. डॉ. तोंडकर विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र शासन, श्री. दिपक गोपाळ परब पत्रकार दैनिक “प्रहार” व इतर मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
