सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर. के. अध्यापक महाविद्यालय, यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, यांचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ३० मार्च २०२३ रोजी संपन्न झाला. या सोहळ्यास संस्थेचे संचालक/संस्थापक श्री रमेश खानविलकर, राजरामशेठ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या रश्मी खानविलकर, यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुंबई विभागीय संचालक डॉ. वामन नाखले, शिवसेना प्रवक्ते श्री अरुण सावंत, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री. ज्ञानदेव हांडे, मिहिर बारोटे सर, आर. के. अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापक खिलोनी राऊलकर, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
