30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ, भांडुप संचलित राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता .या क्रीडा महोत्सवाची सुरुवात 6 डिसेंबर 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करून व शालेय परिसरामध्ये बँड पथक व लेझीम पथकाच्या साह्याने क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांची क्रिडा दौड काढून करण्यात आली. सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ .गार्गी मॅडम यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .खानविलकर मॅडम यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. सर्व विद्यार्थी शाळेच्या क्रीडांगणावर उपस्थित असताना वार्षिक क्रीडा महोत्सवासंबंधी नियम व दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली. खेळातील शिस्त आणि गौरवा सन्मानार्थ क्रीडा शपथ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .खानविलकर मॅडम यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना दिली. तीन दिवसीय हा क्रीडा महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ६ डिसेंबर २०२३ ते ८ डिसेंबर २०२३ या तीन दिवसांमध्ये कबड्डी, खो-खो, डॉज बॉल ,लंगडी असे सांघिक खेळ व नेमबाजी, रिंग तयार करणे, तीन पायांची शर्यत, स्मरणशक्ती असे अनेक विविध प्रकारचे बुद्धीला चालना देणारे वैयक्तिक खेळ खेळण्यात आले.सर्व खेळांना त्या त्या खेळातील तज्ञ शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन केले.नियम व अटींचे तंतोतंत पालन करण्यात आले.या क्रीडा स्पर्धांच्या तीन दिवसीय खेळांचे नियोजन सौ . मेघा अहिरे मॅडम यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांनी खेळातील शिस्त व नियम यांचे काटेकोरपणे पालन केले .खेळातील हार व जित यापेक्षा सहकार्य व संघ भावनेला महत्त्व देऊन शाळेचा,समाजाचा पर्यायाने राष्ट्राचा गौरव कसा होईल या उद्देशाने विद्यार्थी खेळात सहभागी झाले होते. खेळाची सांगता राष्ट्रगीत घेऊन व खाऊ वाटप करून करण्यात आली. अशा प्रकारे आमच्या शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.