Anti-Drug Awareness Week 2022
सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल खिंडीपाडा भांडुप (प.) मुंबई आयोजित दिनांक १६/१२/२०२२ ,वार:शुक्रवार रोजी अंमली पदार्थ विरोधी जागरूकता सप्ताह हा कार्यक्रम शालेय सभागृहात पार पडला. भांडुप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन उनवणे सर, वसंत साहेब यांनी मुलांना , अंमली पदार्थाच्या सेवनाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ,पोस्को कायदा,शारीरिक स्पर्श , सोशल मीडिया व तंबाखूचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले,मुलींनी आपली भूमिका कशी खंबीर असावी, कणखर वागावे याची माहिती दिली .शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी रमेश खानविलकर मॅडम यांनी अंमली पदार्थाचे शरीरावर हानिकारक शारीरिक दुष्परिणाम याची माहिती दिली .रिद्धेश रमेश खानविलकर यांनी शाळेच्या वतीने श्री.उनवणे साहेब व वसंत साहेब यांचा सत्कार केला.शाळेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.