*सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल शाळेमध्ये आज शनिवार दिनांक- ५ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी रमेश खानविलकर मॅडम यांच्या हस्ते शालेय मैदानात पांडुरंगाच्या दिंडीचे पूजन करण्यात आले. शाळेतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात आरती घेण्यात आली, पांडुरंगाच्या नामघोशाचा जयघोष करत करण्यात आला. विठ्ठलाचे अभंग गायन झाले. तिथून पालखी शांतीनिकेतन येथील गणपती मंदिरामध्ये आली आरती व अभंग गावून,राधाकृष्ण मंदिर, शास्त्रीनगर, मुलुंड (प.)येथील साईबाबा मंदिर अमरनगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये अभंग गायन, देवांच्या आरत्या, विठ्ठलाचा नाम घोष करण्यात आला. वारीमध्ये विविध प्रादेशिक सामाजिक स्तरातील लोक एकत्र येतात ज्यामुळे सामाजिक सलोखा वाढतो वारीमुळे वारकऱ्यांमध्ये एकतेची भावना वाढते. मानवी मनाच्या सर्व अवस्था त्यागून स्वतःच्या शोधात असताना जगाच्या कल्याणाचा शोध घेत स्वतःमधील भगवंताला भेटणे हीच खरी वारीची समर्पता असते. माऊलींच्या जयघोषात स्वतःमधील भगवंताला मानवाशी एकरूप करून समतेसाठी पायी चालणारा जीव म्हणजे खरे वारकरी. जगाला भुलवणारी आपल्या पंढरपुरातील विठुरायाची आषाढी वारी ही मानवी शुद्धतेचे सर्वात मोठे माध्यम आहे .अशा या वारीचा सोहळा राजाराम शेठ विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. संपत्ती सोहळा न आवडे मनाला, लागला तो लळा पंढरीचा.
जावे पंढरीशी, आवडे मनाची आषाढी एकादशी.
“व्रत हे तुका म्हणे ऐसी आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहि”
असा हा वैष्णवांचा सोहळा आज दिंडी स्वरूपात सजला होता.
समता, समानता, बंधुता, आदर्श, स्नेह ,प्रेम, भक्तिभाव सामाजिक ऐक्य, मानवी एकात्मता या जागतिक शांतता आणि मानवी सलोख्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मानवी संबंधाचे स्वरूप केवळ लाखोंच्या संख्येने याच ज्ञान पंढरीत पहायला आणि अनुभवायला मिळतील. एकमेकांच्या पायांचे दर्शन घेऊन या वारीमध्ये मानवी आदर आणि औदार्य जगाला मिळते. विश्वशांतीसाठी आवश्यक असणाऱ्या मानवतेचा महामार्ग म्हणजेच पंढरीची वारी. म्हणूनच एकदा तरी पाई वारी अनुभवावी सगळ्या मोह मायाजाळातून बाहेर पडून वैष्णवांचा मेळा अनुभवण्याचा आज आमच्या शाळेत योग आला.
दानधर्म पुण्यधर्माने करुणेचा भावसागर जाणावा,
या ज्ञान पंढरीच्या माध्यमातून मजला तुजला होऊ दे,
दे केवळ बंदुभाव,
दे भक्ती भाव
दे प्रेम भाव
दे वारीची सहिष्णुता अंगीकारू दे अंत:करण विशाल होऊ दे
दे साथ दे…… मदतीचा हात दे वारीचा छंद भरू दे
मानवतेचा गंध पसरू दे….. असा मानव जातीच्या कल्याणाचा विश्वशांतीचा संदेश देऊन आमचा दिंडी सोहळा सौ.खानविलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गोल रिंगण सादर करून उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला
