सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल भांडुप (प.),मुंबई शाळेत आज ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शाळेच्या सभागृहामध्ये राजारामशेठ विद्यालय मराठी माध्यम इ.५वी व इ.८ वी ,सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल इयत्ता ९ वी वर्ग सहभागी झाले होते. प्रणाली मॅडम यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.काही विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.किरण यादव मॅडम यांनी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून घोषवाक्य व भित्तिचित्र बनवून घेतलेली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी खानविलकर मॅडम यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम म्हणजे जगाला मिळालेली एक बहुमोल देणगीच होय. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देऊन त्यांनी भारतीय लोकांची वेगळीच ओळख जगामध्ये दाखवून दिली. जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणीवर मात करून जगासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व उभे केले. दुर्दैवाने ते आज आपल्यात नसले तरीसुद्धा त्यांचे विचार ,त्यांचे आदर्श असंख्य लोकांसमोर उभे आहेत. त्यांनी तयार केलेले अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रामुळे देशाची सुरक्षितता अधिक मजबूत होण्यास मदत मिळालेली आहे.स्वप्न ते नव्हे जे झोपल्यावर पडतात तर खरे स्वप्न ते असतात जे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय झोपच लागू देत नाहीत हे वाक्य फार प्रेरणादायी असल्याचे मॅडम यांनी सांगितले.
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विषयी त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्याविषयी त्यांनी लावलेल्या क्षेपणास्त्रातील शोधा विषयी व त्यांना मिळालेल्या पद्यश्री, पद्मभूषण, भारतरत्न पुरस्कारांविषयी व अग्निपंख या त्यांच्या आत्मचरित्र विषयी माहिती श्री.संदीप खताळ सर यांनी दिली व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
