30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल. खिंडीपाडा भांडुप शाळेत शाळेचा ३० वा वर्धापन दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचा वर्धापन दिन हा शाळेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. सकाळी शालेय विद्यार्थ्यांची शालेय परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. पर्यावरण संरक्षण संदर्भात व शालेय शिक्षण संदर्भात घोषणा देण्यात आल्या. श्री. नरळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे लेझीम सादरीकरण केले. शाळेच्या सभागृहामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खानविलकर मॅडम यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. ज्योती मॅडम यांनी शाळेच्या स्थापनेपासून शाळेचा इतिहास, शाळेच्या यशामध्ये विविध शाखांच्या विस्तारीकरणा सोबत मिळालेले पुरस्कार, शासनाचा उत्कृष्ट संस्था पुरस्कार, श्री.रमेश खानविलकर सर यांचे दप्तराचे ओझे कमी करणे शासकीय कमिटी, विविध शासकीय पुरस्कार तसेच एसएससी बोर्ड सलग शंभर टक्के निकाल, सिद्धिविनायक मंदिर सेवा ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जाणारे विविध उपक्रमाची माहिती दिली. श्रीमती ज्योती मॅडम सौ. खानविलकर मॅडम यांचे शालेय पत्र वाचून दाखवले. सौ.रश्मी रमेश खानविलकर मॅडम यांनी शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रत्येक संघर्षात, यशात, संकटात दिलेल्या योगदानाचे महत्व, सर्व बाबींचे साक्षीदार असल्याची माहिती या पत्रातून मधून मिळाली. कुमार निखिल गुरव इयत्ता नववी यांनी गीत गायन केले इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मनस्वीर हाटे यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी झोरे यांनी देखील शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार श्रीमती ज्योती शिंदे मॅडम यांनी केले. अशा प्रकारे आमचा शालेय वर्धापन दिन कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.