30 Years of Growth in Education.

आज दिनांक 6/9/2023 वार बुधवार दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
गोकुळाष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंद साजरा केला जातो .या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता .त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्या जन्माच्या दिवशी दहीहंडी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावाने बोलावले जाते. जसे की गोविंदा ,बालगोपाल, गोपाल, केशव हि श्रीकृष्णाचे प्रसिद्ध नावे आहेत. गोकुळाष्टमी ही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रत्येक वर्षी साजरी केली जाते.
अशाच प्रकारे सालाबादप्रमाणे आमच्या शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सवात सादर करण्यात आला. सर्व गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी खानविलकर मॅडम व सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका सौ गार्गी पवार मॅडम यांनी दहीहंडीचे पूजन केले. नंतर सर्व बालगोपाल आनंदात उत्साहात नाचत बागडत दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर लावत होते .होते तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली .अशाप्रकारे अतिशय उत्साही वातावरणात दहीहंडी उत्सव शाळेमध्ये साजरा करण्यात आला.