30 Years of Growth in Education.

आज दिनांक सहा जानेवारी 2024 रोजी मुंबई पेट शोच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय पाळीव प्राणी आणि डॉग शोचे आयोजन दिना पाटील इस्टेट स्टेशन रोड भांडुप पश्चिम या ठिकाणी करण्यात आले होते. राजाराम शेठ विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .रश्मी रमेश खानविलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांनी आज या पेटस् शोच्या कार्यक्रमास भेट दिली .या ठिकाणी विविध मांजरांच्या जाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविध प्रजाती आणि पक्षी, कबुतरांच्या अडतीस प्रजाती, उंदरांच्या विविध जाती, विविध आकाराच्या उंचीच्या, रंगांच्या कोंबड्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या . पुस्तकात वाचलेल्या आणि राणीच्या बागेत पाहिलेल्या अनेक प्राणी पक्षांना जवळून पाहण्याची संधी आमच्या विद्यार्थ्यांना अनुभवता आली. महाराष्ट्र निसर्ग उद्यान माहीम या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जाऊन पक्षांचा आवाज प्राणी पाहत असल्याचा भास आम्हाला आज होत होता. विविध प्राणी पक्षी पाहण्याची मुलांना फार उत्सुकता होती आणि ती उत्सुकता आज पूर्ण झाली. अतिशय स्तुत्य आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारा , प्राणी,पक्ष्यांविषयी आपुलकी निर्माण करणारा असा हा उपक्रम होता. या पेटस् शोचे आयोजन राजोल संजय पाटील यांनी केले होते .असेच उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावे . अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या निसर्गाविषयी, पर्यावरणाविषयी, प्राणीमात्रांविषयी आत्मीयता वाढण्यास मदत होणार आहे. हा पेट्स शो पाहिल्यानंतर शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी पाटील हिने TV- 9 मराठी , झी 24 तास,सी एन इ न्यूज चैनल ला आपले मत व्यक्त करून माहिती दिली. असेच उपक्रम पुन्हा पुन्हा राबवावे व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालवी अशा शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे आमचा पेटस् शो पाहण्याचा कार्यक्रम अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला.