सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय ,सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, आर . एस.ज्यू.कॉलेज खिंडीपाडा भांडुप या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. रस्त्यावरून प्रवास करताना लोकांना सुरक्षित करणे हाच रस्ता सुरक्षा सप्ताहचा उद्देश आहे. सर्व रस्ते वापरकर्ते पादचारी ,दुचाकी ,चार चाकी, बहु – चाकी वाहने आणि इतर वाहतूक वाहन वापरकर्त्यांना सुरक्षित करण्यासाठी आहे. रस्ता सुरक्षा उपयांचा सराव करणे हे आयुष्यभर सर्व लोकांसाठी खूप चांगले आणि सुरक्षित आहे .रस्ते सुरक्षेचे काही प्रभावी उपाय म्हणजे वाहनाविषयी मूलभूत जागरूकता, हवामान आणि रस्त्यांच्या परिस्थितीनुसार बचावात्मक वाहन चालवणे वाहनातील दिवे आणि सीट बेल्ट लावणे ,वाहनातील आरशांचा चांगला वापर , अतिवेग टाळणे,रस्त्यांवरील दिवे समजून घेणे , वाहनांमध्ये अंतर राखणे होय अशी माहिती वाहतूक पोलिस हवालदार सौ.तायडे मॅडम यांनी दिली. अपघात किंवा कोणत्याही गंभीर दुखापती पासून स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आपण सुरक्षा नियमांचे पालन केले पाहिजे. रस्ता ओलांडताना, झेब्रा क्रॉसिंगवर,वाहन चालवताना काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापर करताना सुरक्षेचे नियम विचारात घेणे फार गरजेचे आहे. सिग्नल यंत्रणा कशी काम करते. तीन रंग कोणता संदेश देतात याची माहिती श्री. कांबळे सर पोलीस अधिकारी वाहतूक विभाग, मुलुंड यांनी दिली. ज्योती शिंदे मॅडम यांनी वाहतूकी च्या संदर्भात नियम का पाळणे आवश्यक आहे याची माहिती दिली .श्री रोहित मिश्रा एनजीओ चे प्रमुख यांनी रस्ता सुरक्षा अभियानाबरोबरच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक जीवनात आदर्श असे नागरिक निर्माण होण्यासाठी नियमांचे व कर्तव्यांचे पालन करणे हि आपली जबाबदारी असल्याची माहिती दिली, रस्ता सुरक्षा संदर्भातील प्रतिज्ञा घेण्यात आली.श्री. संदीप खताळ सर यांनी वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात छोटे-छोटे उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. अशाप्रकारे रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह आमच्या शाळेत अतिशय उत्साही व आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.