30 Years of Growth in Education.

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजाराम शेठ विद्यालय सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल आर एस जुनियर कॉलेज खिंडीपाडा भांडुप या ठिकाणी आज दिनांक ५ फेब्रुवारी वार:- सोमवार रोजी मातृ-पितृ पूजन दिवस अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला .मातृ -पितृ भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे, आई-वडिलांची सेवा केल्यामुळे गुरूंच्या सेवेचा लाभ आपल्याला होतो .आई- वडील आणि गुरु यांची सेवा करणे ही सर्वात उत्तम तपश्चर्या आहे असे प्राचीन ऋषीमुनी म्हटले आहे. आईचा आशीर्वाद मोलाचा आहे तो अधिक फलदद्रूप होतो असे म्हटले जाते . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रश्मी खानविलकर मॅडम यांनी पती – यांनी एकमेकांशी एकनिष्ठ राहणे, वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा करणे यातून कुटुंब व्यवस्था बळकट होत जाते मात्र पाश्चात्यांच्या अंधानूकरण्याच्या जात्यात या देशाची तेजस्वी संस्कृती हि भरडली जात आहे. म्हणून मुलांवर बालवयातच चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. नम्रतेचे आणि नमस्कारचे संस्कार बालपनीच होणे आवश्यक आहे. आई-वडिलांची, वृद्धांची निरपेक्ष केलेली सेवा ही साक्षात ईश्वर सेवा असते. आई-वडिलांची साधना केली तर वडीलधाऱ्यांची सेवा करा असे सांगावें लागणार नाही आणि पाश्चिमात्यांप्रमाणे एका विशिष्ट डे चीही आवश्यकता पडणार नाही. सगळेजण साधनारत, संस्कारी आणि धर्माचरण करणारे असले तर संस्कारी समाज निर्माण होईल मातृदेवो भव… पितृदेवो भव…… हे केवळ मूल्य शिक्षणाच्या पुस्तकापुरते किंवा तत्त्वज्ञानाप्रमाणे न राहता प्रत्यक्षात उतरेल अशी माहिती दिली. सर्व मातापित्यांची पूजन करून शालेय मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, अशा प्रकारे मातृ-पितृ पूजन सोहळा अतिशय प्रसन्न व आनंदमय वातावरणात पार पडला.