30 Years of Growth in Education.

भांडुप -सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर. के. बी. एड व डी.एड. महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र,टिळक विद्यापीठ पुणे यांचे संयुक्तपणे वार्षिक कला,क्रीडा सांस्कृतिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संस्थेच्या शैक्षणिक संकुलातील कै.श्रीराम खानविलकर सभागृहात नुकताच पार पडला.
या प्रसंगी रिद्धेश खानविलकर,प्रा. परदेशी ,प्रा. रुपेश तांबे व प्रशिक्षित शिक्षकांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘ज्ञानप्रवाह’ विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक संचालक रमेश खानविलकर व रश्मी खानविलकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन झाले प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय प्रेरणा वक्ते डॉ. फिरदोस श्रॉफ प्रसिद्ध लेखिका व नवदुर्गा पुरस्कार विजेता पुनम राणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता जाधव मुंबई महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी श्री. प्रसाद डोके मुंबई विद्यापीठ विधी महाविद्यालयाचे व्याख्याते अँड समिर जाधव सर व अन्य मान्यवर उपस्थित होते
संस्थापक संचालक रमेश खानविलकर यांनी प्रशिक्षित शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आज प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत, निर्भयता, एकाग्रता, वाचन संस्कृती, कौशल्य, यांचेही ज्ञान देऊन, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती नष्ट करून कोणतीही गोष्ट प्रामाणिकपणे व मेहनतीने केली की साध्य करता येते ही भावना बिंबवणे आवश्यक आहे. पुढचे शिक्षण संगणकीय ज्ञानाबरोबर कौशल्यावर असेल, जपानमध्ये ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अंगातील कला, गुण, व कौशल्य ओळखून त्या शाळेत शिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे आपल्याला करावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध प्रेरणा वक्ते डॉ. फिरडोस श्रॉफ म्हणाले की, या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात फक्त शिक्षकच घडवले जात नसून ‘शिल्पकार शिक्षक’ घडवले जात आहे जे येथून बाहेर पडल्यानंतर ते ज्या शाळेत जातील तिथे आदर्श विद्यार्थीच घडवले जातील. पुस्तकीय ज्ञाना बरोबर संस्कार देऊन विद्यार्थी घडवणे या संस्थेचे मौल्यवान कार्य आहे.
प्रसिद्ध लेखिका सौ . पुनम राणे म्हणाले की, आर.के.शिक्षण शास्त्र महाविद्यालयास २५ वर्षे पूर्ण झाली अखंड ज्ञानयज्ञ सुरू आहे या यज्ञातून साने गुरुजी बाहेर पडतील अखंड महाराष्ट्रात खानविलकर सरांच्या प्रेरणेने तयार झालेले आधुनिक शिक्षक साने गुरुजी प्रमाणे कार्य करतील. भांडुप मधील डोंगराळ भागात २५ वर्षांपूर्वी सुरू केलेला या ज्ञानयज्ञाचे ‘महायज्ञा’ चे स्वरूप धारण केलेले आहे. अँड . समीर जाधव व श्री प्रसाद डोके यांनीही विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा कौतुक केले . प्रशिक्षित सर्व शिक्षकांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केला.