भांडुप (प) सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शैक्षणिक संकुलात आर. के. बीएड व डी. एड. महाविद्यालयात संस्थेचे संचालक सदस्य रिद्देश खानविलकर यांच्या संकल्पनेतून आधुनिकतेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मल्टीस्पोर्ट ग्राउंडचे उद्घाटन केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, विद्यार्थी संघटनेचे नेते चंद्रशेखर कांबळे, राजोल संजय पाटील, आदर्श मुख्याध्यापक श्री विश्वास धुमाळ ,सनग्रेस हायस्कूलचे संस्थापक श्री भालचंद्र दळवी व शिक्षण संस्था चालक व मुख्याध्यापक विविध पक्षाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
भांडुप मधील विद्यार्थी व खेळाडूंना जी मैदाने उपलब्ध आहेत त्यांची अवस्था दयनीय आहे याचा विचार करून रिद्देश खानविलकर यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व भांडुप,मुलुंड,पवई,कांजूर मार्ग,विक्रोळी येथील खेळाडूंना विविध प्रकारच्या खेळामध्ये आवड निर्माण व्हावी, त्यांना मनसोक्त खेळता यावे, खेळाचा सराव करता यावा या उद्देशाने चांगले व आधुनिक सोयीयुक्त ‘आर के मल्टीस्पोर्ट ग्राउंड’ तयार करून ते सर्व खेळाडूंना उपलब्ध करून दिल्याने उद्घाटन प्रसंगी सुमारे ४०० ते ५०० खेळाडू व प्रशिक्षक हजर होते. मैदान पाहण्यासाठी प्रचंड प्रमाणात स्थानिक रहिवाशांनी गर्दी केली होती.
याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले यांनी आपल्या मार्गदर्शन मनोगतात म्हणाले की, रमेश खानविलकर व त्यांचे कुटुंबीय शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून भांडुप मध्ये शाळा महाविद्यालये सुरू करून गोरगरीब समाजातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय गेली अठ्ठावीस वर्षे करत आहेत. आता “टर्फ ग्राउंड” तयार करून त्यांनी ईशान्य मुंबईतील खेळाडूंना मैदान उपलब्ध करून दिले रमेश खानविलकर व कुटुंबीय सातत्याने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करतात गोरगरिबांना मदत करतात कॅन्सर पीडित,आदिवासी समाज,ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाना त्यांची नेहमीच मदत असते व त्यांचे सर्वच उपक्रम ,गोरगरिबांच्या व समाजातील गरजू लोकांसाठी असतात. आता या मैदानाचा वापर ईशान्य मुंबई तील सर्व खेळाडूंना होईल व भविष्यात चांगले खेळाडू तयार होतील याची मला खात्री आहे. रमेश खानविलकर व आपली साथ आयुष्यभर राहील केंद्र शासन,राज्य शासन यांच्याकडून जी मदत लागेल ती मदत मिळवून देईल. रमेश खानविलकर यांच्या आयुष्यावरील ‘वादळवाट’ हे पुस्तक भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोचवायचे काम मी निश्चितच करीन असे आश्वासनही केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना दिले.