सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय ,सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, आर. एस.जुनिअर कॉलेज.खिंडीपाडा. भांडुप (प.), मुंबई आज या ठिकाणी दिनांक:- 20/11/ 2023 वार:- सोमवार रोजी युथ ऑन द मूव, भांडुप या एनजीओच्या माध्यमातून आदिवासी,गोरगरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय बॅग, स्टेशनरी व ब्लॅक शूज चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.खानविलकर मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.इटालियन लेखिका , प्रथितयश उद्योजिका, प्रमुख अतिथी श्रीम.दिनशा बासचिरातो मॅडम, श्री. अगरवाल सर, श्री.खंडागळे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांडुप,श्री.रोहित मिश्रा सर यांचे स्वागत सन्मानचिन्ह व पुष्गुच्छ देउन करण्यात आले.
श्रीम.दिनशा बासचिरातो मॅडम यांनी विद्यार्थिनींना महिला सबलीकरण विषयी माहिती दिली त्याचप्रमाणे आपण शिकून कसं मोठं होता येतं वरिष्ठ पदावर जाण्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करावा, आपल्या परिस्थीत बदल कसा घडवावा यासंबंधीचे मार्गदर्शन केले. स्काऊट गाईड महाराष्ट्र प्रेसिडेंट, श्री.विष्णू अग्रवाल सरानी स्काऊट गाईड संदर्भात व देश सेवेच्या संदर्भात स्वयंशिस्त, राष्ट्सेवा, सामाजिक जनजागृती, नियमांचे पालन या संदर्भात माहिती दिली.श्री विष्णू खंडागळे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भांडुप, यांनी मानवी निर्देशक निर्देशांक कसा गणला जातो. आपल्या देशाचा कीती आहे, किती पाहिजे,भारताचा जीडीपी वाढण्यासाठी आपण काय केले पाहिजे, यांची मुद्देसूद मांडणी केली .प्रगत राष्ट्र कसं घडत. राष्ट्राने विकसित होण्यासाठी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती केली तर समाजाची पर्यायाने देशाची प्रगती होते. यासाठी वाचनावर भर द्यावा.स्वयंशिस्त अंगी बाणावी आणि वाम मार्गाला न लागता कुटुंब व शाळेने जे संस्कार दिले आहेत त्याप्रमाणे वर्तन करावे असे मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापिका सौ. खानविलकर मॅडम यांनी आमच्या शाळेचे विद्यार्थी शिस्तप्रिय व आदर्श नागरिक घडवण्यासाठी शाळेत राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थी इंडियन आर्मी ,महाराष्ट्र पोलीस दल या ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती दिली.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप खताळ सर व आभार प्रदर्शन सौ.दीप्ती परमार मॅडम यांनी केले.
