30 Years of Growth in Education.

अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्त्वातून मूल्ये फुलविणार्‍या, ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज दिनांक 5 सप्टेंबर 2023 वार मंगळवार डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस निमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता दहावीचे विद्यार्थी शिक्षक म्हणून त्यांनी आज वर्गावर अध्यापनाचे कार्य केले. कु. प्रियंका नरुटे , कुमार दर्शन मोरे , कु तन्वी राऊत यांनी त्यांना आलेले अनुभव सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रश्मी खानविलकर मॅडम यांनी शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सौ अपर्णा मात्रे मॅडम व श्रमती ज्योती शिंदे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.